Breaking News >> News >> Loksattaमुंबई – Loksatta


गोंधळ, पत्राच्या भाषेवरून राज्यपाल नाराज; मंत्र्यांना सुनावले


Link [2022-03-05 18:54:41]



विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ९ तारखेला घेण्याची योजना असून त्याला राज्यपालांची मंजूरी आवश्यक आहे. ही मान्यता मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण, जयंत पाटील, नाना पटोले, अनिल परब, एकनाथ शिंदे आदींनी राज्यपालांची भेट घेतली. तेव्हा राज्यपालांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. त्यावर विधान परिषदेतील १२ नियुक्त सदस्यांचा प्रस्ताव अनेक दिवस प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधण्यात  आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. . त्यावर   कोश्यारी यांनी ठोस उत्तर दिले नाही, असे समजते.  राज्यपाल आ आणि महाविकास आघाडीतील वादात विधानसभा निवडणुकीला राज्यपालांकडून अनुकूल प्रतिसाद मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.

The post गोंधळ, पत्राच्या भाषेवरून राज्यपाल नाराज; मंत्र्यांना सुनावले appeared first on Loksatta.



Most Read

2024-09-19 04:02:01